सहभाग तुमचा

>विद्यार्थी सुरक्षा योजना

राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना

योजना उद्दिष्ट / वैशिष्टये :-

राज्यातील इयत्ता 1 ली पासुन उच्च शिक्षण घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना वेयक्तिक विमा योजना शासन निर्णय क्र. पीआरई 2001 /57783 /2891/ प्राशि - 1 दिनांक 20/8/2003 अन्वये सुरु करण्यात आलेला आहे. तसेच 1 वर्षा पर्यंत विमा कंपनीस विद्यार्थ्यांचा विमा संरक्षणाचा कालावधी नेमुन दिलेला असतो.हि योजना राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी चालवलेल्या शाळा, तसेच खासगी संस्थांनी चालवलेल्या मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालये या मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली आहे.

या योजने अंतर्गत विद्यार्थ्याला दुर्दैवाने मृत्यू आल्युअस त्याच्या पालकांना रु. ३०,००० /- एव्हढी नुकसान भरपाई मिळते. तसेच कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रु. ५०,००० /- नुकसान भरपाई मिळते. अपघातामुळे कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिये साठी रु. १०,००० पर्यंत खर्च मिळतो. तसेच अवयव निकामी झाल्यास रु. २०,०००/- एव्हढी रक्कम मिळते. अपघातामुळे विद्यार्थ्याची पुस्तके हरवल्यास रु.३५० /-, विद्यार्थी परीस्खेस बसू न शकल्यास रु. ६५० /-, अपघातामुळे सायकल चोरीला गेल्यास किंवा नुकसान झाल्यास रु. १५००/- व चष्मा हरवल्यास रु. ७५०/- पर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते

या या संदर्भात अधिक माहिती संबंधित मुख्याध्यापक,  शाळा प्रशासन ,ग्राम पंचायत किंवा  गटशिक्षण अधिकारी , पंचायत समिती  यांच्याकडे मिळू शकते,