शिवजन्माची पहाट  Created By : Shyam Wadhekar Language : Marathi Description
: This poems describes the first rising day of Maratha History , i।e
the day of Chatrapati Shivaji's birth on fort shivneri. सूर्यकीरणे गारव्याला होती जाळत शिवनेरीवर भगवाही होता खेळत , येणार्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल शिवजन्मान पडणार होत पहिल मराठी पाउल ...
मराठ्यांचा प्रत्येक आश्रू जिजाउन साठवला होता , आई भवानीस तेच आश्रू देऊन पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता ...
मंदिर थराराली , शिवनेरीची तोफ कडाडली वार्याची कोवळी झुळुक दर्या खोर्यात दरवळली , जिजाउपोटी मराठ्यांचा राजा अवतरला सांगत मुकी पाखरही किलबीलली ....
नगारा वाजला ,शाहिरी साज चढला डंका डोंगरा आड सांगत सुटला , आता सह्याद्रीवर भगवा फडकनार मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकनार ....
इतिहासच पाहील पान शिवजन्मान लिहाल गेल होत , हिरव्या दगडावर आता भगवे रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत!
- श्याम वाढेकर |
|