राष्ट्रीय
गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना
योजनेचे नाव :
पूर्व
माध्यमिक व माध्यमिक
शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती.
योजना
/कार्यक्रमाचे स्वरूप / माहिती व व्याप्ती : गुणवान
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळातील
विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना अस्तित्वात
आहे. पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दरवर्षी घेत
असलेल्या स्पर्धात्मक परीक्षांच्या निकालावर प्रामुख्याने गुणवत्तेनुसार
शिष्यवृत्त्या दिल्या जातात. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची
समाधानकारक प्रगती व चांगल्या वर्तणुकीच्या आधारे पुढे चालू राहते. शासन
निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक
एससीएच-२००५/(१३९/०४)/केंपुयो, दिनांक १४ फेब्रुवारी २००७ अन्वये सन
२००७-०८ या वर्षापासून पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीचे (इयत्ता ८ वी ते १०
वी) सुधरित दर रुपये १०० दरमहा करण्यात आले आहेत. प्रत्येक
टप्प्यात शिष्यवृत्तीचा कालावधी तीन वर्षांचा आहे. ही
शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षात १० महिन्यांसाठी दिली जाते. उपरोक्त
शासन निर्णयान्वये संचात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक
जिल्ह्याचे ग्रामीण व नागरी क्षेत्रासाठी शिष्यवृत्तीचे ७९०८ संच मंजूर
असून त्यापैकी शहरी भागासाठी ३११८ संच व ग्रामीण भागासाठी ४७९० संच तसेच
माध्यमिक शिष्यवृत्तीचे ७६२८ संच मंजूर असून त्यापैकी शहरी भागासाठी ३२०२
संच व ग्रामीण भागासाठी ४४२६ संच मंजूर आहेत.
विदर्भातील
विद्यार्थ्यांना विद्यावेतन :- महाराष्ट्र
राज्य परीक्षा
परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणा-या स्पर्धा परीक्षेच्या आधारे
पूर्व माध्यमिक, माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेमध्येच विदर्भातील
विद्यार्थ्यांना विद्यावेतन पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्तरावर देण्यात
येते. सदर योजना फक्त नागपूर, अमरावती विभागासाठीच असून
त्याचे एकूण पूर्व माध्यमिक स्तरावर ३६६ व माध्यमिक स्तरावर १९८ संच मंजूर
आहेत. सदर विद्यार्थ्यांना जुन्या दरानेच शिष्यवृत्तीची
रक्कम देण्यात येते.
योजनेचा उद्देश : गुणवान
विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी पूर्व माध्यमिक व
माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
अंमलबजावणी
यंत्रणा :- शिक्षणाधिकारी
(माध्यमिक) (प्राथमिक) जिल्हा
परिषदेमार्फत राबविली जाते.
|