सुशिक्षित आणि कृषिविषयक माहिती असलेले तरुण आपल्या गावामध्ये "कृषी माहिती आणि विस्तार केंद्र" स्थापन करू शकतात. ह्या केंद्राच्या स्थापनेसाठी शासनाकडून रु. ५०,००० पर्यंतचे अनुदान मिळू शकते. काय असते कृषी माहिती आणि विस्तार केंद्र? > १. शेतकऱ्यांना विविध कृषिविषयक बाबींचे शास्त्रीय ज्ञान देणे आणि वेळो वेळी सल्लागार म्हणून काम करणे २. विविध प्रगत तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणे ३. विविध शेतीविषयक योजना आणि अनुदानांची माहिती जमा करणे आणि शेतकर्यांना देणे ४. पाणी, माती आणि पिकावरील रोग विषयक सल्ला देणे या योजनेचा लाभ कोणतेही पदवीधारक व शेतकरी घेऊ शकतात. या योजनेतून मासिक उत्तपन्न रु. १५००० ते २०००० इतके असू शकते. संबंधित योजनेची अधिक माहिती तालुका कृषी अधिकारी यांचेकडे मिळेल. |