स्पर्धेच्या जगात, शेतकऱ्याला बाजार भावांची अपडेटेड माहिती देणे आणि कृषी क्षेत्रात एक व्यावसायिक दृष्टीकोन आणण्यासाठी शिक्षित तरुण बाजार माहिती केंद्राची स्थापना करू शकतात. या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना विविध कृषी मालाच्या वेगवेगळ्या बाजारातील भावांची माहिती देण्यात येईल आणि जास्तीत नफा कसा मिळवावा या बद्दल शेतकऱ्याला मार्गदर्शन केले जाईल. संबधित केंद्र या बाजार भावांचा अभ्यास करून शेतकऱ्यांना कोणते पिक घ्यावे या बद्दल सुद्धा सूचना करू शकते. अशा प्रकारच्या केंद्रांचा उभारणी खर्च खूप कमी आहे आणि त्यासाठी शासनाकडून अनुदान हि मिळते. असे केंद्र चालवणे ही इंटरनेट आणि दूरसंचार तंत्र यामुळे खूप सोपे झाले आहे. अनुदान पूर्ण खर्चाच्या २५ % किंवा जास्तीत जास्त रु. ५०००० इतके मिळू शकते. सदर योजनेची आधीक माहिती तालुका कृषी अधिकारी यांचेकडे मिळेल. |