सहभाग तुमचा

>शेतकरी मंडळ


शेतकरी मंडळ  [सामुहिक प्रगतीचा मार्ग]

उद्देश:  शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करणे
स्थापणेसाठी अट: कमीत कमी दहा शेतकरी सदस्य
कार्य पद्धत्ती:
 १.
बॅंका, नाबार्ड, शासन आणि गावातील शेतकऱ्यांमधील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून काम करणे जसे त्यांच्याद्वारे प्रसारित होणारी ध्येयधोरणे, परिपत्रके, शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान, सवलती इत्यादीविषयी माहिती गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे, तसेच निरनिराळ्या संस्थांशी समन्वय ठेवणे
२. शेतीविषयक कार्यक्रमांचा वार्षिक कृती आराखडा तयार करणे.
३. उच्च प्रतीचे बियाणे, खते, औषध व्यवस्था करणे.
४. शेती तज्ज्ञांना बोलावून आधुनिक तंत्रज्ञान गावकऱ्यांपर्यंत पोचविणे.
५. शेतीच्या विविध पद्धती, मत्स्योत्पादन, मधमाशीपालन, शेळी-मेंढीपालन, निरनिराळ्या पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान इत्यादी विषयांवर शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करणे.
६. गांडूळखत, कृषी यांत्रिकीकरण, उच्च प्रतीचे बियाणे या विषयांवर कार्यशाळा घेणे.
७. फळपिके, फुलशेती, नवीन तंत्रज्ञानाविषयी कार्यशाळा घेणे.
८. नवीन तंत्रज्ञान, कृषी यंत्रे, ऊर्जांचे नूतनीकरण इत्यादी विषयांवर प्रात्यक्षिक दाखविणे.
९. पर्यावरण संरक्षणावर जागृती अभियान चालविणे.
१०. गावपातळीवर माती परीक्षण; पाण्याचे, खतांचे नियोजन करणे.
११. भूजल परीक्षण, किचन गार्डन, झाडे लावणे, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, अन्न सुरक्षितता, सामुदायिक साक्षरता, बिगरशेतीवर आधारित स्वउद्योग यांवर कार्यशाळा आयोजित करणे. १२. महिला बचत गटांची स्थापना करणे व बॅंकेला जोडणे.
शेतकरी मंडळ स्थापन करण्यासाठी  आपल्या भागातील कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठाशी संपर्क साधावा