केंद्र सरकार पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना: या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे व उपकरणांच्या खरेदीसाठी अनुदान पुरवठा करण्यात येतो. सदर अनुदान ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे, बैलचलित अवजारे व स्वयंचलित अवजारे, महिला व शेतमजूर यांच्यासाठी लागणारी अवजारे, कृषिपंप, फलोत्पादन अवजारांसाठी वापरता येतो. ४० अश्वशक्तीपर्यंतच्या ट्रॅक्टरसाठी किमतीच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त ४५ हजार रुपयांचे अनुदान देय असते. या योजने अंतर्गत येणारी काही अवजारे आणि यंत्रे: पॉवर टिलर, ट्रँक्टर, मल्टी क्रॉप थ्रेशर, कल्टीव्हेटर इ. या शिवाय अनेक यंत्रे या योजनेत समाविष्ट आहेत. केंद्र पुरस्कृत राबविण्यात येणाऱ्या ह्या योजनेच्या अधिक माहिती साठी कृषी अधिकारी,पंचायत समिती यांना भेटावे आणि सदर योजनेच अर्ज आर्थिक वर्षाच्या सुरवातीस त्याच्याकडे द्यावा लागतो. |