Jump to Navigation

जिजाऊ.कॉम विषयी

 

  • जिजाऊ.कॉम हे कुठल्याही विशिष्ट जातीच्या, धर्माच्या अथवा पक्षाच्या झेंड्याखाली काम करीत नाही, जिजाऊ मा साहेब, शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्या महान कर्तुत्वाला कुठल्याही प्रकारच्या सीमा लादण्याचा आम्हाला कसलाही अधिकार नाही.  

  • आपल्या इतिहासाचे आपल्याला ज्ञान नसले तरी त्याची जान मात्र आपल्या प्रत्येकाला असलीच पाहिजे म्हणून हा उज्वल इतिहास आपल्या समोर एक कायम स्वरूपी प्रेरणा म्हणून उभा करण्याचे कार्य जिजाऊ.कॉम च्या माध्यमातून करण्याचा ध्यास आहे  

  • एक नवे घडवण्याचे सामर्थ्य आम्हाला आमच्या याच इतिहासाने दिले आहे, याच प्रेरणेतून आज कित्येक लोक आप आपल्या परीने काही तरी करीत आहेत किंवा काही तरी करण्याची प्रकट इच्छा बाळगून आहेत अश्या सर्व सामाजिक भान असणार्या लोकांसाठी जिजाऊ.कॉम हे एक व्यासपीठ म्हणून काम करेल. आजच्या तरुण पिढी समोर काही प्रश्न उभे आहेत जसे कि, काय करावे? कसे करावे ? आणि कुठे करावे ? ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी जिजाऊ.कॉम एक माध्यम म्हणून सदैव आपल्या सोबतीला असेल.  

  • सध्या वाढत चाललेली सामाजिक आणि आर्थिक दरी, शहरी आणि ग्रामीण भागातील समस्या, शिक्षण, नौकरी-व्यवसाय या सारख्या तरुणांच्या जीवनाशी निगडीत प्रश्नांना उत्तरे शोधण्याचे काम जिजाऊ.कॉम च्या माध्यमातून केले जाईल , त्या साठीचे मार्गदर्शन त्या त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांच्या मार्फत केले जाईल.  

  • राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचे व्यक्तिमत्व हे इतिहासातील एक निर्विवाद आणि सर्वोच्च प्रेरणास्थान आहे, इतिहासातील हे पहिले व्यक्तिमत्व जिने सर्वप्रथम "स्वराज्याचे" स्वप्न पहिले, ज्यांनी आम्हाला एक इतिहास दिला, आम्हाला एक ओळख दिली, म्हणून या स्वतंत्र आणि स्वाभिमानी विचारांच्या चळवळीला त्याच माउलीचे नाव देणे हे सर्वओपातरी योग्य ठरेल. म्हणून जिजाऊ.कॉम.  

  • महाराष्ट्रातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत विकासाची गंगा पोचवणे हे एक उद्दिष्ट, शासनाच्या विविध शैक्षणिक, सामाजिक, ग्रामीण विकासाच्या योजनांची सखोल माहिती आणि मार्गदर्शन जिजाऊ.कॉम च्या माध्यमातून केले जाईल  

  • आज समाजामध्ये असे असंख्य लोक आहेत जे आपल्या व्यायाक्तिक पातळीवर किंवा एका छोट्या ग्रुप च्या साह्याने अगदी कुठलीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी काही तरी करत असतात, अश्या लोकांना आज समाजासमोर येण्याची वेळ आली आहे, जिथे सगळी कडे दुष-प्रवृत्तींनी आप आपल्या सीमा ओलांडायला सुरुवात केली आहे तेव्हा त्या विरुद्ध लढा देण्यासाठी आपण सर्वांना एकत्रितरित्या उभे करण्याचा प्रयत्न जिजाऊ.कॉम करीत आहे.  

  • जिजाऊ.कॉम च्या माध्यमातून एक टीम सतत कार्यरत राहील, हि टीम समाजातील गरजू विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, आणि कष्टकर्यांना होईल तेवढी - होईल त्या प्रकारे सर्वोपतरी मदतीचा हात देईल. विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अविकसित भागातील शैक्षणिक दर्जा वाढवणे त्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा प्राप्त करून देणे या साठी जिजाऊ,कॉम सतत कार्यशील राहील . सामाजिक बांधिलकी असणाऱ्या लोकांची एक साखळी निर्माण करून त्यांच्या माध्यमातून हे कार्य सध्या करण्यात येईल त्या साठी जिजाऊ.कॉम टीम एक पाऊल पुढे टाकल्याशिवाय राहणार नाही.  

  • आज हि आमची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या हि ग्रामीण भागात राहते, शहरी विकास, शिक्षण आणि ज्ञान खेड्यापर्यंत पोचवण्यासाठी आणि खेड्यातील समस्या त्यांचे प्रश्न शहरी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जिजाऊ.कॉम एका सेतू प्रमाणे काम करील.



Main menu 2

by Dr. Radut.